शहादा । तालुक्यातील पिंगाणे येथील जिल्हा परिषद शाळेत लोणखेडा केंद्राची शिक्षण परिषद आयोजीत करण्यात आली होती.
यात डिजीटल वर्गाचे उद्घाटन पंचायत समिती माजी सभापती माधव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपसरपंच रविंद्र पाटील पोलीस पाटील, दीपक पाटिल, खुशाल पाटील, ग्रामसेविका शितल अहिरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापु मोरे, शिक्षण विस्तारअधिकारी योगेश साळवे, डी. टी. वळवी, केंद्रप्रमुख दिलीप खोंडे, मुख्याध्यापक रामकृष्ण सोनवणे उपस्थित होते. यावेळी बोलतांना शिक्षणविस्तार अधिकारी सावळे म्हणाले की, डिजीटल वर्ग हा चालता बोलता मुलांना शिक्षण देणारा वर्ग आहे. त्याचा लाभ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावा. शिक्षकांनी याचे महत्व समजुन घ्यावे विध्यार्थीमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करावी. याव्यतिरिक्त मुख्याध्यापक सोनवणे, रामोळे, ललीत बोरसे, राजभोज, सौ.बावीस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षणविस्तार अधिकारी वळवी यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत श्रेणीबाबत माहिती दिली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक रामकृष्ण सोनवणे यांनी केले. आभार शिंदे यांनी मानले.