पिंग मशिनरी दुरुस्तीच्या कामासाठी 22 लाखांचा वाढीव निधी

0

गवळीमाथा येथील कामासाठी स्थायीची मान्यता

पिंपरी : भोसरी-गवळीमाथा येथील पंपिंग मशिनरी देखभाल दुरुस्तीचे काम एक्सेल इलेक्ट्रिक्स यांना 39 लाख रुपयात 25 जानेवारी 2018 रोजी एक वर्षाच्या कालावधीकरिता देण्यात आले आहे. परंतू, त्यासाठी आणखीन 22 लाखांचा वाढीव खर्च देण्यात येणार असून त्याला स्थायी समितीने नुकतीच ऐनवेळी मान्यता दिली. सेक्टर 23 येथील पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत विभागांतर्गत विविध पंप हाऊसद्वारे संबंधित परिसरात पाणीपुरवठा केला जातो.सेक्टर 23 येथील पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत विभागांतर्गत विविध पंप हाऊसद्वारे संबंधित परिसरात पाणीपुरवठा केला जातो.

त्यासाठी पंपिंग मशिनरी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहण्यासाठी मशिनरीची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने भोसरी गवळीमाथा येथील पंपिंग मशिनरी देखभाल दुरुस्तीचे काम एक्सेल इलेक्ट्रिक्स यांना 25 जानेवारी 2018 रोजी एक वर्षाच्या कालावधीकरिता देण्यात आले आहे. या कामाची निविदा रक्कम 40 लाख रुपये आहे. निविदा खर्चाची मर्यादा 39 लाख इतकी आहे. या कामावर अंदाजे 11 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे या कामात 25 लाख 36 हजार 166 रक्कम शिल्लक राहत आहे. परंतु, 22 एप्रिल 2018 रोजी भोसरी गवळीमाथा येथील मुख्य विद्युत पॅनेल जळाल्यामुळे नवीन पॅनेल बसविण्यात येणार आहे.

स्थायीची ऐनवेळी मान्यता
त्यासाठी अंदाजे 22 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने हे पॅनल तातडीने बसविणे आवश्यक आहे. या कामाची मुदत 24 जानेवारी 2019 पर्यंत आहे. त्यामुळे भविष्यात गवळीमाथा पंप हाऊस येथील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रक्कम शिल्लक राहत नाही. त्यामुळे निविदा रक्कमेस वाढवी मान्यता दिली आहे. या कामाच्या मूळ 39 लाख रुपये आणि वाढीव 22 लाख रुपये अशा एकूण 61 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली. विलास मडिगेरी यांनी मांडलेल्या ठरावाला सागर अंगोळकर यांनी अनुमोदन दिले.