पिंजार झाडी गावातील अवैध धंदे बंद करण्याची नागरिकांची मागणी

0

साक्री । तालुक्यातील पिजारझाडी गावात अवैध धंदे व दारू बंदी करण्याची मागणी साक्री पोलीसांना गावकर्‍यांनी निवेदनाद्वारे केली आहे. बुरूडखे ग्रृप ग्रामपंचायत पिंजारझाडी, साबरसोंडा, पाचमौली या ग्रामपंचायत अंतर्गत पिंजारझाडी गावातील तरूणांनी बैठक घेवून गावात चालणार्‍या अवैध धंदे, दारू, जुगार, पत्त्यांचा क्लब व इतर अवैध व्यवसाय बंद करण्यात यावा यासाठी तरूणांनी ग्रामपंचायतीत बैठक बोलवून सर्वानुमते गावात चालणार्‍या अवैध धंदे बंद करून गावातील समाज एकोपा निर्माण करण्याचा निर्णय घेतला. गावात सुरू असलेले दारू, पत्ते, सट्टे व्यावसायिकांवर तात्काळ कारवाई करून बंद करण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे.

यांनी दिले निवेदन
निवेदन देण्यासाठी उमेश गावीत, भरत देसाई, जंगु सोनवणे, अनिल सुर्यवंशी, रामचंद्र साबळे, दिनेश पवार, छोटीराम मधले, भरत जगताप, रामलाल पवार, बकराम मालचे, छोटीराम साळी, गुलाब सोनवणे आदी उपस्थित होते. गावात दारूबंदीसाठी तरूणांनी एकत्र येवून सरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांच्याशी चर्चा करून गावकर्‍यांसोबत बैठक घेवून गावातील अवैध धंदे बंद करण्याचा हा पहिलाच प्रयत्न केला आहे.

दारूबंदी करण्यासाठी पिंजारझाडी गावातील तरूण एकत्र आले असून गाव दारूबंदी करण्यात तरूणांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मात्र, तरूण शिक्षण न घेता व्यसनांच्या आहारी जातांना दिसत आहेत. आदिवासी समाजातील दारूच्या नशेत तरूणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघटनेकडून प्रयत्न केला जात आहे. – रामचंद्र साबळे, ग्रामस्थ

पिंजारझाडी गावात दारूमुळे तरूणांची व्यसनाधिन होण्याचे प्रमाण वाढले आहे. आज तरूणांनी पुढाकार घेवून गावात दारूबंदी करण्यासाठी पोलीसांना हाक दिली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेने तरूणांना सहकार्य करून गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी गावकर्‍यांना सहकार्य करावे. – दिलीप गावीत

गावात गेल्या दोन वर्षांपासून लग्न कार्यासाठी बँड बंद केला आहे. दारू पिणार्‍यांमुळे लग्नात वाद होत असतात. त्यामुळे गावात बँड लावून लग्न लावले जात नाही. त्यामुळे गागवातील दारू बंद करून लग्नासाठी गावात बँड वाजविण्याची प्रथा सुरू करणार आहोत.-मुरलीधर जगाप, नागरिक