पिंपरखेड जवळील लालबर्डी धरणातील पाणी चोरी

0

चाळीसगाव । तालुक्यातील लालबर्डी-पिंपरखेड धरणातून सर्रासपणे वीजपंपाच्या माध्यमातून पाण्याची चोरी होत असून पाण्याची पातळी पुर्णपणे संपली आहे.

दरम्यान पिंपरखेड गावाला भीषण पाणीटंचाई निर्माण होणार असून हि पाणी चोरी थांबवावी, अशी मागणी ग्रामपंचायतचे उपसरपंच वसंत सूर्यवंशी, सदस्य सिदार्थ मोरे व ग्रामस्थ दीपक मोरे यांनी पाटबंधारे विभाग व संबंधित विभाग यांना पत्रकाद्वारे कळविले आहे.