पिंपरखेड येथे उद्या जि.प. शाळेत कार्यक्रम

0

चाळीसगाव। तालुक्यातील पिंपरखेड जि.प. मराठी शाळेत शालेय इंग्रजी पुस्तकांचा वितरण सोहळा व सत्कार समारंभ 26 मार्च रोजी सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरखेड गावच्या सरपंच शोभाताई दिनकर संसारे यांच्यासह आमदार उन्मेश पाटील, पं.स.सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, जि.प.सदस्य अमित देशमुख, माजी समाजकल्याण सभापती राजेंद्र राठोड जि प सदस्य सुनंदा चव्हाण पं.स. सदस्य लता दौंड, ओझर मिगचे पं.स. सदस्य प्रदीप अहिरे, गट शिक्षण अधिकारी सचिन परदेशी, केंद्र प्रमुख महारु राठोड उपस्थित राहणार आहेत.