पिंपरीगावात पाच ठिकाणी उभारणार सुलभ शौचालय

0
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे प्रभाग क्रमांक 21 मध्ये स्वच्छतागृहांची उभारणी
पावणे आठ कोटी रुपये खर्च; स्थायी समितीची मान्यता 
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे प्रभाग क्रमांक 21 पिंपरीमध्ये पाच ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्यात येणार आहेत. या कामासाठी सुमारे 1 कोटी 77 लाख रुपये खर्च येणार असून त्याला स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली. महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्‍या प्रभाग क्रमांक 21 पिंपरीमध्ये महापालिकेतर्फे पाच ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्यात येणार आहेत. ‘पैसे द्या अन् वापरा’ या तत्वावर महिला आणि पुरूषांसाठी ही शौचालये व स्वच्छतागृहे असणार आहेत. अय्यप्पा मंदिराजवळ दोन पुरूष व दोन महिला शौचालय आणि एक मुतारी, राधिका चौकात एक पुरूष व एक महिला शौचालय आणि एक मुतारी बांधण्यात येणार आहेत.
थेट पद्धतीने दिले काम
त्याचप्रमाणे पीसीएमसी कॉर्टर्स येथे सहा पुरूष व तीन महिला शौचालय आणि चार मुतारी, पिंपरीगाव पीएमपीएल बसस्थानकाजवळ सहा पुरूष व तीन महिला शौचालय आणि चार मुतारी, तर शिवशक्ती माता मंदिरामागे दोन पुरूष व एक महिला शौचालय आणि दोन मुतारी, अशा पाच ठिकाणी एकूण 27 शौचालय आणि 12 मुतारी बांधण्यात येणार आहेत. निविदा न मागविता थेट पद्धतीने मेसर्स सुलभ इंटरनॅशनल सोशिएल सर्व्हिस ऑर्गनायझेशन या संस्थेकडून हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे काम लवकर होईल. तसेच यामुळे परिसरातील नागरिकांची तसेच बाहेरून येणार्‍या नागरिकांची मोठी सोय होणार आहे. या परिसरात स्वच्छतागृह नसल्यामुळे गैरसोय होत होती.
स्वच्छतेसाठी कर्मचारी
महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणार्‍या या शौचालयांमध्ये ‘पे अँड युज’ तत्वावर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे ही स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्यासाठी कर्मचारी असणार आहेत. या कामासाठी 1 कोटी 39 लाख 91 हजार 889 रुपये असा अंदाजपत्रकिय खर्च अपेक्षित आहे. त्यावर 0.5  टक्के इन्शूरन्स, 12  टक्के जीएसटी आणि 15  टक्के कार्यवाही भार शुल्क लागू होणार आहे. त्यानूसार पिंपरीमध्ये पाच ठिकाणी बांधण्यात येणार्‍या सुलभ शौचालयासाठी 1 कोटी 77 लाख 6 हजार 665  रुपये इतका खर्च येणार आहे. स्थायी समिती सभेत त्याला मान्यता देण्यात आली.