पिंपरीच्या टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांच्या पासपोर्ट सुविधेसाठी पिंपरीच्या एचए कंपनी समोरील मुख्य टपाल कार्रालरात येत्या रविवारपासून (दि. 2 एप्रिल) पोस्ट ऑफिस पासपोर्ट सर्व्हिस सेंटर (पीओपीएसके) खुले होणार आहे. आतापर्रंत पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना पासपोर्टसाठी पुणे शहर गाठावे लागत होते. ही धावपळ कमी करण्यासाठी पुण्याप्रमाणेच पिंपरीच्या मुख्य टपाल कार्यालयात पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्र खुले केले जाणार आहे.

दिवसाला 50 लोक भेट देऊ शकणार
या कार्यालयात सुरुवातीला दिवसाला 50 लोक पासपोर्टसाठी भेट देऊ शकतील. गरजेनुसार त्रात सुधारणा करण्यात येणार आहे. हे कार्यालय पुणे विभागीर कार्यालयांतर्गत काम करणार असून, पुणे विभागाचे हे दुसरे पीओपीएसके असणार आहे. यामध्ये पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर रा जिल्ह्यातील नागरिकदेखील पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात.

संकेतस्थळावरही अर्ज करता येणार
या बरोबरच नागरिक संकेतस्थळावरही आपल्या पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात. जेथे ऑनलाइन अर्ज भरणे, ऑनलाइन भरणा करणे अशा सुविधा उपलब्ध आहेत. ही ऑनलाइन सेवाही दि. 30 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून खुली करण्यात येणार आहे. वॉक इन, ऑन होल्ड तसेच तत्काळ पासपोर्टच्या सेवा इथे दिल्या जाणार नाहीत, अशी माहिती पुणे क्षेत्रीर पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे रांनी प्रसिद्धीपत्रकाद्नारे दिली आहे.