पिंपरी-चिंचवड । रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, सूर्या मदर अॅण्ड चाईल्ड केअर हॉस्पिटल आणि महापालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत बालरोग चिकित्सा व निदान शिबिरात 50 बालरुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. पिंपरीतील, जिजामाता रुग्णालयात रविवारी झालेल्या या शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा रोटरी 3131 प्रांतपाल प्रशांत देशमुख यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष चिंतामणी अभ्यंकर, सचिव रवींद्र भावे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष विलास काळोखे, सचिव नितीन शहा, प्रकल्प प्रमुख प्रदीप वाल्हेकर, बाळकृष्ण उर्हे, जसविंदर सिंग, दिलीप पारेख, दादासाहेब उर्हे, संजय मेहता, बाळासाहेब रिकामे, सुरेश शेंडे, डॉ. राजेंद्र भोसले, स्वाती अभ्यंकर, आनंद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
या शिबिरात डॉ. दिलीप एकसंभे, डॉ. कपिल जाधव, डॉ. तन्मय बाहेती यांनी मुलांची तपासणी केली. यामध्ये जन्मत: हृदयविकार, संधीवाताचा हृदयविकार, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, जन्मत: मधुमेह, मूत्र विसर्जनाचे आजार याबरोबर पक्षाघात, कुपोषण, हर्निया, ब्लॉन्ट्स आजार, अतिरिक्त बोट, पाय बाहेरील बाजूस वाकणे, ओठांमधील टाळूतील फट आदी आजारांची तपासणी करण्यात आली. शिबिरात 50 बालरुग्णांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारंग माताडे यांनी केले. तर, प्रदीप वाल्हेकर यांनी आभार मानले. बाळकृष्ण उर्हे, राम भोसले यांनी शिबिराचे संजोयन केले.