पिंपरी : पिंपरीतील एचए कंपनीच्या मैदानावर रविवारी पहाटे 20 ते 22 वर्षीय तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु आहे. घटनास्थळी पिंपरी विभागाचे सहायक आयुक्त रामचंद्र जाधव, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कल्याण पवार, गुन्हे विभागाचे निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी पाहणी करून पुढील तपास सुरु केला .