पिंपरीतील समस्यांची आयुक्त, आमदारांकडून पाहणी 

0
पिंपरी चिंचवड : पिंपरीतील स्मशानभूमी, पत्राशेड, मिलिंदनगरचे रखडलेले पुनर्वसन, काळेवाडी ते सुभाषनगर हा नियोजित उड्डाणपूल आदी रखडलेल्या कामांची पाहणी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पिंपरीचे आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांनी केली. महापालिका प्रशासन झोपडपट्टीवासियांच्या प्रश्‍नांकडे चालढकल करत असल्याबद्दल आमदार चाबुकस्वार यांनी आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत परखड शब्दात नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांनी पिंपरीतील प्रश्‍नांच्या सोडवणूकीसाठी समक्ष पाहणी करण्याचे निश्‍चित केले होते. सहशहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, नगरसेवविका निकिता कदम, शिवसेनेचे विभागप्रमुख अनिल पारचा आदी या दौर्‍यात सहभागी झाले होते. दरम्यान, या भागातील समस्यांंबद्दल आयुक्तांनी अधिकार्‍यांना तातडीच्या सूचना दिल्या.