पिंपरी : खून, दरोडा, लुटमार, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे तब्बल 20 गुन्हे दाखल असलेला पिंपरीतील सराईत गुंड बजरंग उर्फ बज्या वाघेरे याला पुणे जिल्ह्यातून एक वर्षा करीता तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी केली.
हे देखील वाचा
बज्या अगदी कमी वयात गुन्हेगारी क्षेत्रात आला. 2007 मध्ये त्याच्यावर पहला गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे तब्बल 20 गुन्हे दाखल आहेत. बज्याची पिंपरी परिसरात दहशत होती. यावर आळा घालण्यासाठी पिंपरी पोलिसांनी बज्यावर तडीपारीची कारवाई केली आहे.