पिंपरीतील ३ दिवसांपासून बेपत्ता मुलीची हत्या

0

पिंपरी- पिंपरीत सोमवारपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुलीची हत्या करण्यात आली असून मुलीच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने ही हत्या केल्याचा संशय आहे. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यच्या आधारे तपास करत आहे. हत्येपूर्वी तिच्यावर अत्याचार झाले होते का?, हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.

पिंपरीत राहणारी ७ वर्षाची मुलगी सोमवारी राहत्या घराजवळून बेपत्ता झाली होती. मुलीचे आई – वडील घरातून बाहेर गेले होते. मुलगी त्यांच्याच मागे गेली. मात्र, आई – वडिलांना ती आपल्या मागे आल्याचे लक्षात आले नाही. यानंतर ती बेपत्ता झाली. हा प्रकार लक्षात येताच आई -वडिलांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. परिसरात शोध घेतल्यानंतर आई – वडिलांनी शेवटी पोलिसांकडे मिसिंगची तक्रार दाखल केली.

गुरुवारी सकाळी एच ए कंपनीच्या मैदानावर मुलीचा मृतदेह आढळला. एका नागरिकाने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृतदेहाची ओळख पटली.