पिंपरीतून पाच गुन्हेगार तडीपार

0

पिंपरी : मारहाण, आर्थिक गैरव्यवहार व जुगार अशा गुन्ह्यांमध्ये सराईत असणार्‍या पाच गुन्हेगारांना पिंपरी पोलिसांनी तडीपार केले. शक्ती रामरतन बहोत (वय-30, रा. पिंपरी), विशाल बबन गायकवाड (वय-22, रा. पिंपरी), मनोहर मारुती सुर्वे (वय-40, रा. पिंपरी), जितेंद्र सावळाराम शिंदे (वय-30, रा. पिंपरी), लक्ष्मण बाळू शिंदे (वय-33, रा.पिंपरी) अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाणे हद्द परिसरातील गुन्हेगारीवर अंकुश निर्माण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. हे गुन्हेगार परिसरात दहशत माजवत होते. या पाचही आरोपींना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतिष पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस शिपाई सुहास डंगारे, शैलेश मगर, गणेश कर्पे यांनी केली.

मागील चार दिवसातील पिंपरी पोलिसांची ही तिसरी कारवाई असून परिमंडळ एक मधून ऑगस्ट ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत 19 आरोपी तडीपार करण्यात आले आहेत.