पिंपरीत आशिष शेलार यांच्या विरोधात निदर्शने

0

शिव व्यापारी सेनेतर्फे आंदोलन

पिंपरी-चिंचवड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याच्या निषेधार्थ शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्या वतीने रविवारी पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळा चौकात भाजपचे आशिष शेलार यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतेच खालच्या पातळीवर जाऊन बेताल वक्तव्य केले. शिवसेनेला मिळणारा वाढता जनप्रतिसाद आणि पराभूत मानसिकतेतून शिवसेनेची धास्ती घेऊन त्यांनी ही टीका केली असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

यांचा होता सहभाग
यावेळी शहर संघटक रवीकिरण घटकार, गणेश आहेर, राहुल कदम, नितीन गाडवे, जितेंद्र चौधरी, संतोष ढवारे, सतीश भवाळ, गोरख पाटील, उपविभाग प्रमुख प्रदीप दळवी, राज गिरी, रोहित विभूते, शाखा प्रमुख सागर शिंदे, नवनाथ माऊली जाधव, चैतन्य जोशी, तानाजी गायकवाड, अमोल तेलंगे, विभाग अधिकारी युवा सेना संजय सिंधू आदी उपस्थित होते.