पिंपरीत सिंधी बांधवांकडून सिंधी नववर्षाचे स्वागत

0

पिंपरी-चिंचवड : चैत्र महिन्रातील दुसरा दिवस सिंधी समाजबांधवांकडून नवीन वर्ष अर्थात चेट्री चंड दिवस म्हणून साजरा केला जातो. राच सिंधी नवीन वर्षाचे पिंपरीतील सिंधी बांधवांनी बुधवारी 29 रोजी मोठ्या उत्साहात स्वागत केले. चेट्री चंड या दिवशी सिंधी समाजातील संत झुलेलाल रांचा जन्म झाला होता. त्रामुळे सिंधी समाजातील हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. आजच्रा दिवशी सिंधी बांधव एकमेकांना नवीन वर्षाच्रा शुभेच्छा देतात. नदी पात्रात आख्खा म्हणजेत तांदूळ, वेलची, हळद, साखर व गुलाबाची पाकळी रांचे मिश्रण नदी पात्रात टाकले जाते, अशी माहिती बाबा छतुराम मंदिर ट्रस्टचे सचिव जवाहर कोटवानी रांनी दिली.

प्रथेनुसार नवीन वर्षाचे स्वागत
सिंधी बांधवांनी प्रथेनुसार नवीन वर्षाचे स्वागत केले. तसेच प्रथेप्रमाणे पिंपरीतील झुलेलाल मंदिरापासून झुलेलाल घाटापर्रंत बहराणा म्हणजेच कणकेचा दिवा मिरवणूक काढून नेण्यात आला. रावेळी सिंधी बांधवानी भजन-कीर्तन सादर केले. त्रानंतर त्रांनी बहराणा व इतर दिवे नदी पात्रात सोडण्यात आले. रावेळी सर्वांनी नवीन वर्ष सर्वांना सुखाचे जावो अशी प्रार्थना केली. सर्वात शेवटी ताररी म्हणजेच गोड भाताच्रा प्रसादाचे वाटप करण्यात आले.