पिंपरीत ६ दुचाक्या जळून खाक; घटनेबाबत संशय

0

पिंपरी- पिंपरीच्या मिलिंदनगर परिसरात ६ दुचाकी जळल्याची घटना घडली आहे. पहाटे 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अद्याप गाड्या जाळल्या गेल्या की,शॉर्ट सर्किटमुळे घटना घडली हे अस्पष्ट आहे.या घटने दुचाकीसह कपडे आणि घरातील साहित्य जळाले आहे. घटनेत ४ लाखांचा नुकसान झाले आहे. या घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

पिंपरीच्या मिलिंद नगर परिसरातील कपिला हाऊसिंग सोसायटी येथील इमारतीच्या घरासमोर पार्क केलेल्या गाड्यांना पहाटे अचानक आग लागली. यामुळे परिसरातील नागरिकांची धावपळ सुरू झाली. या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना स्थानिक नागरिकांनी दिली. त्यानुसार तातडीने घटनास्थळी येऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.या घटनेत ऐकून ६ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.