पिंपरी, आकुर्डी लोकन्यायालयात 700 खटले निकाली

0

पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व दिवाणी फौजदारी न्यायालय आणि पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयात 700 दावे निकाली काढण्यात आले. यावेळी पिंपरी न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश ए.ए. धुमकेकर व अन्य न्यायाधीश उपस्थित होते. तर आकुर्डी न्यायालयामध्ये आर.एम.गणवीर ,प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. दिनकर लाळगे पाटील व नगरसेवक दत्ता साने आदी उपस्थित होते. यावेळी पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेश पुणेकर, अ‍ॅड. अतिश लांडगे, अ‍ॅड. कालिदास इंगळे, अ‍ॅड. प्रसन्ना लोखंडे, अ‍ॅड, गणेश राऊत, अ‍ॅड. योगेश थंबा, अ‍ॅड. सुदाम साने, अ‍ॅड. केशव घोगरे आदी उपस्थित होते.

50 लाखांचे होते खटले
लोकन्यायालयामध्ये आकुर्डी न्यायालयातील दिवाणी व प्रिलीटिगेशन म्हणजेच दाखलपूर्व असे एकूण 36 खटले निकाली निघाले. प्रिलिटिगेशन खटले एकूण 14 लाख 63 हजार, 413 एवढया रकमेचे होते. तर पिंपरी न्यायालयामध्ये फौजदारी दिवाणी व कलम 138 व प्रिलिटिगेशनचे असे एकूण 664 खटले निकाली लागले. तर प्रिलिटिगेशनचे 85 खटले निकाली लागले. हे खटले एकूण 49 लाख 90 हजार 196 एवढ्या रकमेचे होते. अशा प्रकारे पिंपरी व आकुर्डी न्यायालयाचे 700 खटले निकाली लागले असून हा आकडा विक्रमी असल्याचे सांगितले.

हे होते पॅनेल परीक्षक
लोकन्यायालयामध्ये पॅनल परीक्षक अ‍ॅड. निलेश ठोकळ, अ‍ॅड. प्रियंका अडागळे, अ‍ॅड. विठ्ठल डेंगळे, अ‍ॅड. मोनिका गाढवे, अ‍ॅड. अजिंक्य मराठे, अ‍ॅड. करामतुल्ला कादरी, अ‍ॅड. पुनम राऊत, अ‍ॅड. सचिन पाटील, अ‍ॅड. शिवाजी महानवर, अ‍ॅड. रुपाली तोरखडे यांनी काम पाहिले, प्रास्ताविक अ‍ॅड. तुकाराम पडवळे यांनी केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. कांता गोरडे यांनी केले. अ‍ॅड. तुकाराम पडवळे यांनी आभार मानले.