पिंपरी उपबाजारात पालेभाज्यांची आवक वाढली

0

पिंपरी : पिंपरी उपबाजारात रविवारी 83 क्विंटल फळभाज्यांच्या आवक झाली असून, पालेभाज्यांची 17,850 गड्ड्या एवढी आवक झाली. फळभाज्यांपैकी कांद्याची आवक 25 क्विंटलने वाढली असून, क्विंटलमागे भावदेखील एक हजार रुपयांनी वाढले आहेत. टोमॅटोची आवक दोन क्विंटलने वाढली असून, भाव 500 रुपयांनी घटले आहेत. भेंडीची आवक एक क्विंटलने घटली असून, भावात 150 रुपयांची घट झाली आहे. याशिवाय फ्लॉवरची आवक पाच क्विंटलने घटली असून, भाव 150 रुपयांनी घटले आहेत. ढोबळी मिरचीची आवक चार क्विंटल व भावात 500 रुपयांची घट झाली आहे.

पालेभाज्यांचे भाव स्थिर
पालेभाज्यांची आवक वाढली असून, भाव मात्र स्थिर आहेत. या आठवड्यात कोथिंबिरीची 3850 गड्ड्या आवक झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत 750 गड्ड्यांची वाढ झाली आहे. मेथीची आवक 1250 गड्ड्यांनी वाढली आहे. पालकची 900 गड्ड्यांनी तर शेपूची 1000 गड्ड्यांनी आवक वाढली. तर करडईची 450 गड्ड्यांनी आवक घटली आहे.

आवक व भाव असे
कांदा- 26 क्विंटल, 2300, 2500, 2400; टोमॅटो- 16 क्विंटल, 3000, 4000, 3500; भेंडी- 7 क्विंटल, 3000, 3800, 3400; दुधी भोपळा- 1 क्विंटल, 2700, 2700, 2700; फ्लॉवर- 9 क्विंटल, 1500, 1500, 1500; मका- 9 क्विंटल, 1100, 1200, 1110; मिरची- 8 क्विंटल, 4000, 4500, 4250. पालेभाज्यांची आवक व किरकोळ बाजारातील विक्रीचे दर असे- कोथिंबीर-3850 गड्ड्या; मेथी- 3450 गड्ड्या; शेपू- 1950 गड्ड्या; चवळई- 1500 गड्ड्या; पालक- 4000; करडई- 550 गड्ड्या; अंबाडी- 1950 या सर्व पालेभाज्यांची किरकोळ बाजारात प्रती नग 10 रुपयांना विक्री होत आहे.