थकित भाडे गाळे धारकांवर आता कारवाई
पिंपरी-चिंचवड : पिंपरी कॅम्पातील शगून चौकातील फूलव्यापारी व विक्रेत्यांचे पिंपरीतील क्रोमा स्टोअरजवळील मोकळ्या जागेत स्थलांतरण करण्यात येणार आहे. तेथील पालिकेच्या दहा ते बारा गुंठे असलेल्या जागेत 30 गाळे बांधले जाणार आहेत, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली. तसेच दीड वर्षांपासून भाडे थकविणार्या गाळे धारकांवर कारवाई केली जाणार आहे. याबाबतचा निर्णय भूमी व जिंदगी विभागाच्या बैठकीत झाला.
व्यापार्यांची होती मागणी
हे देखील वाचा
शहरातील पिंपरी ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणी खेड व मावळ तालुक्याबरोबरच शहरातील मोशी, चर्होली, डुडुळगाव या भागातील फूल उत्पादक शेतकरी पिंपरीतील बाजारात फुले विक्रीसाठी आणतात. मात्र याठिकाणी फूलबाजारासाठी स्वतंत्र जागा नसल्याने, शगून चौकातील दुकानांसमोरील मोकळ्या जागेत सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत फूलबाजारत भरतो. यासाठी फूल व्यापार्यांना दुकानचालकांना अव्वाच्या सव्वा भाडे मोजावे लागत आहे. त्यामुळे फूलबाजारासाठी स्वतंत्र जागा अथवा गाळे उपलब्ध करुन देण्याची व्यापार्यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती.
क्रोमा स्टोअर्स शेजारी जागा
पिंपरीतील क्रोमा स्टोअर्सजवळील मोकळा भूखंड मेट्रोच्या पार्कींगसाठी आरक्षित ठेवण्यात आला असून त्यातून शिल्लक राहणा-या जागेवर स्थापत्य विभागामार्फत फूल विक्रेत्यांसाठी गाळे उभारले जाणार आहेत, असे महापौर जाधव यांनी सांगितले. तसेच शहरातील कुत्री, डुक्करे पकडण्यात कायदेशीर अडचणी येत आहेत. त्यातून मार्ग काढला जाईल. पशुवैद्यकीय विभागाला अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. क्रीडा विभागाची बुधवारी (दि.26)आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचेही, त्यांनी सांगितले.