पिंपरी : पिंपरी-चिंचवडवासियांची दिवाळी यंदाची फराळ आणि खरेदीबरोबरच अधिकाधिक स्वरमयी करण्यासाठी विविध संस्थांनी दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्यावतीने सुगम संगीत, भक्ती संगीत व भाव गीतांच्या स्वर गंधार या सुरेल कार्यक्रम दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. सोमवार दि. 5 नोव्हेंबरला सकाळी साडे पाचवाजता शिवतेजनगर श्री स्वामी समर्थ मंदिर येथे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन नारायण सदाशिव बहिरवाडे यांनी केले. सोहम योग साधना व फोरम फॉर म्युझिक फाऊंडेशनच्यावतीने स्वरबहार या मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम रविवार दि. 4 नोव्हेंबरला सकाळी सहा वाजता चिंचवड येथील प्रा, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक नगरसेविका अपर्णा डोके, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निलेश डोके यांनी केले आहे.
हे देखील वाचा
ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्राच्या मुक्तिसोपान संगीत विद्यालयाकडून धनत्रयोदशीला दिवाळी पहाट या सांस्कृतिक व कलात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानतर्फे वसुबारसेनिमित्त सायंकाळी सहा वाजल्यापासून गो-माता पूजनाला सुरुवात होणार आहे. रात्री आठ वाजल्यापासून दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. सोमवारी ( दि. 5 ) सकाळी सहा वाजता सूरमयी पहाटचा आनंद घेता येणार आहे. ग्वालियर घराण्याचे विशाल मोघे (पं. उल्हास कशाळकर यांचे शिष्य) यांचे गायन होणार आहे. तर कार्यक्रमाचे निवेदन रेवती सौदीकर करणार असून माधुरी आंबेकर यांनी संयोजन केले.