पिंपरी-चिंचवडकरांच्या चिंतेत भर: एकाच दिवसात 12 जणांना कोरोनाची लागण

0

पिंपरी: महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. काल संपूर्ण महाराष्ट्रात 750 पेक्षा अधिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यात आता पिंपरी चिंचवड येथे देखील एकाच दिवसात 12 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांच्या चिंतेत भर पडली आहे. एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील करोनाबाधितांचा संख्या ७९ वर पोहचली आहे. आतापर्यंत २१ जण बरे होऊन घरी गेले आहेत. आज सापडलेल्या १२ करोना बाधितांमध्ये लहान मुले, महिला, पुरुष यांचा समावेश आहे.