पिंपरी-चिंचवड: शहरात करोना विषाणूने थैमान घातले असून शहरातील काही परिसर आज मध्यरात्रीपासून सील करण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे.
पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, १) घरकुल रेसीडेन्सी बिल्डींग क्र. ए १ ते २० चिखली. (पवार इंडीस्ट्रीयल परीसर नेवाळे वस्ती). २) जामा मस्जिद, खराळवाडी (गिरमे हॉस्पीटल, अग्रेसन लायब्ररी, क्रिश्ना ट्रेडर्स, चैताली पार्क हौसिंग सोसायटी गार्डन, ओम हॉस्पीटल, ओरीयंटल बँक , सीटी प्राईड हॉटेल, क्रिस्टल कोर्ट हॉटेल, गिरमे हॉस्पिटल). ३) कमलराज बालाजी रेसीडन्सी, रोडे हॉस्पीटल जवळ, दिघी, भोसरी (रोडे हॉस्पीटल, एसव्हीएस कॉम्प्युटर, स्वरा गिप्ट शॉपी, साई मंदीर रोड अनुष्का ऑप्टीकल शॉप, रोडे हॉस्पीटल). ४) शिवतीर्थ नगर, पडवळनगर थेरगाव (शिरोळे क्लिनिक, गणेश मंदीर, निदान क्लिनिक, किर्ती मेडीकल, रेहमानिया मस्जिद, ऑर्कीड हॉस्पिटल, अशोका सोसायटी रोडवरील गणपती मंदीर ते शिरोळे क्लिनिक). या परिसरामध्ये पोलीस प्रशासनाकडून पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे संचारबंदी लागू असणार आहे. शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.