पिंपरी: कोरोनाने जगभर हाहाकार माजवला आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. दरम्यान पिंपरी-चिंचवडमधील कोरोना ग्रस्तांचा संख्येत मोठी वाढ झाली आहे. आता पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे नवीन 10 रुग्ण आढळले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना ग्रस्तांची संख्या 106वर पोहोचली आहे. नव्याने सापडलेल्या 10 रुग्णांपैकी 9 रुग्ण रुपीनगर भागातील आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊन अधिक कठोर करण्यात आले आहे. शहरातील अनेक भाग सील करण्यात आले आहे.