पिंपरी चिंचवड :- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आज (गुरुवारी) दुपारी सव्वातीनच्या सुमारास मेघ गर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसानंतर आज झालेल्या या पावसाने वातावरणात बदल झाला आहे.
हे देखील वाचा
पावसाळा सुरू होऊन पंधरवडा उलटला, तरी देखील पावसाळा सुरू झाल्याचे चित्र दिसत नव्हते. पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा होती. दोन दिवसापूर्वी दमदार पाऊस शहरात बरसला होता. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यानंतर रिमझिम सरी बरसल्या. मात्र, मोठा पाऊस आला नव्हता. ही उणीव आज झालेल्या पावसाने भरून काढली. सकाळपासून उन सावलीचे वातावरण होते. दुपारनंतर वातावरणात बदल झाले. सव्वातीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. जोरदार वारा व दमदार पावसाच्या सरी बरसत असल्याने रस्ता दिसेनासा झाला होता.
दोन दिवसापूर्वी दमदार पाऊस शहरात बरसला होता. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यानंतर रिमझिम सरी बरसल्या. मात्र, मोठा पाऊस आला नव्हता. ही उणीव आज झालेल्या जोरदार पावसाने भरून काढली. आज दुपारी पुन्हा पावसाने शहरात हजेरी लावली. विजांच्या कडकडातासह आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडवली. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, वाकड, हिंजवडी या भागात पावसाने हजेरी लावल्याने नागरीका सुखावले आहेत. जोरदार झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना चांगलाच दिलासा मिळाला. पावसामुळे रस्त्यावर पाणीपाणीच साचले असून रस्ते निसरडे झाले. ज्यामुळे वाहनचालकांची चांगलीच फजिती झाली. तर काही परिसरात नागरिकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.