पिंपरी-परतीच्या पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वच नाराज होते. गणेशोत्सवानंतर नावात्रोत्सवात पाऊस येईल अशी अपेक्षा होती. मात्र पावसाने दीर्घ विश्रांती घेतली. दरम्यान आज पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचे दमदार पुनरागमन झाले. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते, त्यानंतर दुपारी ४ वाजेच्या सुमारच अचानक पावसाला सुरुवात झाली. भर दुपारी पाऊस आल्याने नागरिकांची धांदल उडाली. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर निघालेल्याची चांगलीच धावपळ झाल्याची पहावयास मिळाली.
काल संध्याकाळी पुण्यात जोरदार पाऊस झाला.