पिंपरी चिंचवड : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी पिंपरीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला. तर या बैठकीत तीनही विधानसभा मतदारसंघातील प्रभागनिहाय पदांचे वाटप आणि नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा
पदाधिकार्यांकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन…
या बैठकीला मनसेचे नेते राजेंद्र बाबु वागसकर, प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे, पिंपरी चिंचवड शहरचे प्रभारी गणेश सातपुते, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीत शिरोळे, पिंपरी चिंचवड मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, मनसे महिला सेनेच्या शहराध्यक्षा अश्विनी बांगर, मनसे वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष निखिल सांवत तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी सर्व मनसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना या चारही विभागांची तीनही विधानसभा मतदार संघातील प्रभाग निहाय पदांचे वाटप करण्यात आले.