पिंपरी ः नागरिकत्व सुधारणा कायदा , राष्ट्रीय नागरिक नोंदणी व देशातील नवरत्न कंपन्या विकण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी (दि. 24) महाराष्ट्र बंदची घोषणा केली. या बंदला पिंपरी-चिंचवड शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पिंपरी कॅम्पातील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी, दुकानदारांनी आपले दुकान बंद करून बंदला प्रतिसाद दिला. दुपारी वंचित बहुजन आघाडीचे नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पिंपरीतून पदयात्रा काढून बंदची हाक दिली. त्यावर संत तुकारामनगर, भोसरीचा काही भाग, पिंपरी भाटनगर, पिंपरी कॅम्प, गांधीनगर, चिंचवड चापेकर चौक, निगडी ओटा स्कीम- यमुनानगर, आकुर्डी, थेरगाव, रहाटणी भागात काही प्रमाणात बंद पाळण्यात आला.