पुणे-विद्यार्थी व शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका १५ वर्षीय विद्यार्थीनीकडून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. विद्यार्थीनीने दिलेल्या तक्रारीनंतर निगडी पोलिसांनी अटकेची कारवाई केली. महिन्याभरापूर्वी हा प्रकार शिक्षकाने केला होता अशी तक्रार विद्यार्थीनीने दिली आहे.
शिक्षकाने असाईनमेंट जमा करण्याचे सांगितले होते. मात्र मला असाईनमेंट जमा करण्यास एका महिन्याचा विलंब झाला. मी सरांना असाईनमेंट जमा करून घेण्याबाबत विनंती केली असता सरांनी मला आता मुदत संपली असल्याचे सांगत शरीर सुखाची मागणी केली.
निगडी पोलिसांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 354 ए (लैंगिक छळ) अंतर्गत कारवाई केली आहे.