पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा सन 2020-21 चा 640 कोटी 88 लक्ष रुपयांचा अर्थसंपल्प गुरुवारी सादर करण्यात आला. प्राधिकरणारची 343 वी सभा प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव यांनी अर्थसंकल्प प्राधिकरण सभेला सादर केला. प्राधिकरणाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी भगवान घाडगे यांनी विविध विभाग प्रमुखांच्या सहाय्याने हा अर्थसंकल्प तयार केला आहे. अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या अध्यक्षतेखाली सभेत चर्चा होवून अर्थसंकल्प संमत करण्यात आला.