पिंपरी-चिंचवड मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन शिक्षण

0

पिंपरी: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहे. काही वर्गातील परीक्षा देखील घेतली गेली नाही. आता जून महिना सुरू झाला असतानाही शाळा बंदच असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक पुर्व तयारी शिक्षण विभागाने केली आहे. रेडिओ कम्युनिटी अतंर्गत शिक्षकांकडूनच संचलित एफएम चॅनेलद्वारे ऑडीओच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. 15 जूनपासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवारी पिंपरीतील उन्नत केंद्रात दोन सत्रांमध्ये बैठक बोलविण्यात आली आहे. ऑनलाईन शिक्षणाची तयारी म्हणून शिक्षक-पालकांचा व्हाट्सएप गृप तयार करण्यात आले आहे. ब्लॉग तयार करण्यात आले आहे. आवश्यक वाटल्यास स्थानिक केबलद्वारे देखील शिक्षण देण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.