पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगर पालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका आहे. आज सोमवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2020-21 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीला सादर केला. या आर्थिक वर्षांचा मूळ 5232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 628 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. स्थायी सभापती विलास मडिगेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचा तीसरा अर्थसंकल्प सादर केला आहे.