कार्याध्यक्षपदी अनिल वडघुले
पिंपरी : मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रोखठोकचे संपादक गणेश हुंबे तर कार्याध्यक्षपदी अनिल वडघुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा महापौर नितीन काळजे, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रत्येक पदासाठी एक अर्ज आले. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभाकर क्षीरसागर व निवडणूक अधिकारी म्हणून सुनील वाळुंज यांनी काम पाहिले.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – गणेश हुंबे (अध्यक्ष), सायली कुलकर्णी (परिषद प्रतिनिधी), अनिल वडघुले (कार्याध्यक्ष), सुनील फुगे, विश्वास शिंदे (उपाध्यक्ष), दादा आढाव (समन्वयक), संजय बोरा (सरचिटणीस), दत्तात्रय कांबळे (सह सरचिटणीस), अजय कुलकर्णी (खजिनदार), मदन जोशी, रामकृष्ण पालमकर (सह खजिनदार), श्रद्धा कोतवडेकर (हिशोब तपासणीस), अतुल ठाकूर, सीताराम मोरे, जावेद फरान, दीपाली भोंडे आणि राजेंद्र कदम (सदस्य).