संगीत अकादमीचा 19वा वर्धापनदिन उत्साहात
पिंपरी : पिंपरी- चिंचवड महानगरपालिका संगीत अकादमीच्यावतीने निगडी येथील संत तुकाराम व्यापारी संकुल येथे संगीत अकादमीचा 19 वा वर्धापनदिन उत्साहात झाला. निगडी येथे झालेल्या संगीत सभेस महापौर नितीन काळजे, संगीत अकादमीचे मानद सल्लागार व कथ्थकनर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते, स्वरसागरचे मुख्य संयोजक सहशहर अभियंता प्रवीण तुपे, नगरसेविका वैशाली काळभोर आदी उपस्थित होते. यावेळी अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गायन, वादन व नृत्याचे कार्यक्रम सादर केले.
जगदाळे यांचे सुगम संगीत
यावेळी अनंता जगदाळे यांचे सुगम संगीत झाले. वैशाली जाधव, प्रचिती शिखले, प्रतिक्षा केदारे, वैष्णवी गलांडे यांच्यासह हार्मोनियम वादन झाले. समर्थ नेटके व प्रसाद भाग्यवंत यांचे तबला वादन झाले. सुवर्णा भोंडे यांनी सुगम संगीत सादर केले. अनुराधा चौधरी, प्रथमेश चोपडे, हरिदास सावंत, हरिभाऊ आसतकर, रेवा सायकर, कावेरी भावे, रिमा कुलकर्णी यांचे सामुहीक हार्मोनियम वादन झाले. यावेळी गायन आणि वादन शिकलेल्या सर्वांनी याप्रसंगी आपले कौशल्य सादर केले. उपस्थित पाहुण्यांनी याला मनापासून दाद दिली.
डॉ. कपोते यांचे नृत्य
यानंतर कार्यक्रमाची रंगत प्रसिध्द नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांचे कथ्थक नृत्याचे. त्यांनी पं. बिरजू महाराजांनी स्वतः लिहिलेल्या व गायिलेल्या भजनावर अभिनय सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. सुनील अवचट यांच्या बासरीवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबला साथ समीर सूर्यवंशी यांनी केली. कार्यक्रमाचे निवेदन समीर सूर्यवंशी यांनी केले.