महापालिका आयुक्तांना निवेदन
पिंपरी । पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने मराठी माणसावरच अन्याय करून परप्रांतीयासाठी महापालीकेचे गालिचे अंथरून ठेवले आहे त्यामुळे मराठी माणसाकडूनच मराठी भाषेला हद्दपार केले जात आहे, त्यामुळे महापालिकेने सर्व निविदा मराठी भाषेत काढव्यात, अशी मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांच्याकडे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात शासकीय कामकाज 100 टक्के मराठी करणे आवश्यक असून, त्यासाठी 1964च्या महाराष्ट्र राजभाषा कायद्यात काही स्पष्ट तरतुदी आहेत. सरकारच्या आदेशानुसार महापालिकेच्या कामकाजात मराठीचा वापर केलाच पाहिजे. पालिकेतील निविदा प्रक्रीया, ठेकेदारांचे करार, तसेच वर्क ऑर्डर हे मराठीत दिले गेले पाहिजे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने काढण्यात येणार्या निविदा व त्यांची अटी शर्ती मराठीतूनच काढाव्यात राज्य शासनाच्या नियमांनुसार मराठीतुनच कामकाज करणे अनिवार्य आहे, ही निविदा मरातून करावी मराठीतुन निविदा प्रक्रिया करुन गुणात्मक,पारदर्शकता, व स्पर्धात्मकता वाढावी यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महापालिकेचे इतर कामे मराठीतून होत आहेत, मात्र कंत्राटदारांना मराठी येत नसल्यामूळे निविदा इंग्रजीमधून केल्या जात आहेत, त्यामुळे मराठी बांधवावर अन्याय होत आहे, त्यामुळे यापुढील सर्व निविदा मरातुनच काढाव्यात अशी मागणी यावेळी सतीश कदम यांनी केली.