पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे; माजी नगरसेविका मंदाकिनी ठाकरे यांचा भाजपात प्रवेश

0

पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका मंदाकिनी ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीत आज जाहीर प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भोसरी येथील इंद्रायणी थडी जत्रेच्या उद्घाटन कार्यक्रमात हा प्रवेश करण्यात आला.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, राहुल कुल, महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्ष नेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेची पंचवार्षिक निवडणुक दोन वर्षांवर आली आहे. महापालिकेत सध्या भाजपाची एकहाती सत्ता आहे. भाजपाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्यापुढे महापालिकेत सत्ता कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. राज्यात महाविकास आघाडी घोडदौड सुरू असताना पिंपरी चिंचवड शहरात भाजपाची ताकद वाढत आहे. महेश लांडगे यांच्या नेत्वृत्वात राष्ट्रवादीच्या अर्जुन ठाकरे आणि मंदाकिनी ठाकरे यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे.