पिंपरी : – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्तारूढ पक्षनेतेपदी नामदेव ढाके यांची निवड करण्यात आली आहे . भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानंतर ही निवड करण्यात आली असल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली . यावेळी आमदार लक्ष्मण जगताप , महापौर माई ढोरे , स्थायी सभापती विलास मडेगिरी , नामदेव ढाके , माजी पक्षनेते एकनाथ पवार , प्रवक्ते अमोल थोरात , राजू दुर्गे , माजी उपमहापौर सचिन चिंचवडे आदी उपस्थित होते .