पिंपरी – चिंचवड : शहराच्या विकासासाठी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना स्वावलंबी जीवनाची शाश्वती व स्वाभिमान देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. आज भोसरी एमआयडीसी येथे भोर रबर प्रोडक्स येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली व पिंपरी-चिंचवड आघाडीची स्थापना करण्यात आली. यावेळी विकास आघाडीचे अध्यक्ष म्हणून अभय सोपानराव भोर यांची एकमताने निवड करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना भोर यांनी सांगितले की, परिसरात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या योजनेत ओल्ड सिटी पूर्ण दुर्लक्ष होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये कोणतीही स्मार्ट सिटी योजना राबविण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. केवळ शहरातील बाहेरील भागांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. शहरांमध्ये नऊ ते दहा लाख झोपडपट्टी परिसरातील नागरिक आहेत. शहरातील व्यावसायिक तसेच औद्योगिक परिसराकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरातील उद्योगसुद्धा दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. येथील कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. त्यामुळे आत्ताच वेळ आहे, श्रीमंत महानगरपालिका असलेल्या महानगरपालिकेचे नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर नेण्याची व सावरण्याची. यावेळी लवकरात लवकर शहर कार्यकारणी बनविण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी अभय भोर, संभाजी बारणे, भाऊसाहेब आडगळे, बाळकृष्ण थोरात, विजय जाधव, नाना कांबळे, संतोष गायकवाड, उद्योजक कार्तिक गोवर्धन, उद्योजक राहुल भगत, ज्ञानेश्वर शिंदे, प्रकाश शेट्टी, माळवदकर, विशाल पठारे, इस्माईल नदाफ, चेतन साबळे, समीर साबळे, दिनेश जगताप, जगदीप महाले, प्रशांत भिलारे, प्रशांत पठारे व सामाजिक संघटना व ज्येष्ठ कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते. अभय भोर यांच्या वाढदिवसानिमित्त या नव्या संकल्पनेची व शहरातील तरुणांच्या भवितव्याचा विचार करून एक नवीन व्यासपीठ निर्माण केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.