पिंपरी: शहरातील पिण्याच्या पाण्याच्या जलाशयाचे प्रदूषण ह्या मुख्य समस्येला आजपर्यंत सोयीस्करपणे निरनिराळी कारणे समोर करून मोठ्या चतुराईने राजकीय व प्रशासनाकडून चालढकल करून प्रलंबित ठेवण्यात आले आहे. आज जलसंवर्धन दिन आहे आपण आज तरी या बाबत पहिले पाऊल उचलणे पेक्षित असून तातडीने पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयातील पाणी प्रदूषण थांबवावे अशी मागणी इसीएचे चेअरमन पर्यावरण तज्ञ विकास पाटील यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त यांना याबाबत निवेदन दिले आहे.
कोरोना सारख्या महाभयंकर आपत्तीत सुद्धा पुनावळे व रावेत परिसरातील नागरिक सर्रास पिण्याच्या पाण्याच्या डोहात कपडे धुणे व पोहण्या सारख्या आरोग्यास घातक कृती करीत आहेत, हे थांबले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
केंद्र सरकारकडून लॉकडाऊनचे आदेश असताना संचारबंदी गंभीरतेने घेतले जात नसल्याचे विकास पाटील यांनी सांगितले आहे. या परिसराला निर्जनपरिसर म्हणून जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली आहे..