पिंपरी:गेल्या काही दिवसात पिंपरी-चिंचवड शहरात खुनाचे सत्र सुरू आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मित्रासाठी एकाने २० वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह इतरांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
ऋषभ गायकवाड असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपीच्या मित्राचे आणि त्याचा वाद झालेला होता. या पार्श्वभूमीवर काही महिन्यांनी कट रचून शुक्रवारी रात्री उशिरा त्याचा खून करण्यात आला.
मुख्य आरोपी गुड्डया उर्फ किशोर ज्ञानदेव शेलार, सीजीन फिलीप जॉर्ज, रोहित सिंग, सचिन साठे असे खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींची नावे आहेत.
दरम्यान, जॉर्जने ऋषभ बद्दल झालेली घटना सांगितली. त्यानंतर गुड्ड्या आणि जॉर्ज या दोघांनी ऋषभला ठार मारण्याचा कट रचला.