पिंपरी-चिंचवड : शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी तणावाचे वातावरण आहे. सकाळी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमसैनिकांनी रास्ता रोको करत चौकात ठिय्या मांडत चौकात सर्व मार्गानी येणारी वाहने अडवून निषेध नोंदविणे सुरू आहे. दरम्यान, भीतीपोटी बाजारपेठांसह दुकाने, मॉल, चित्रपटगृहे बंद केली आहेत. दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. सर्वत्र मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.