पिंपरी चिंचवड : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियमानुसार पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दि. 20 डिसेंबर रात्री बारापर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असून जमावबंदी लागू केली आहे.
हे देखील वाचा
यासंदर्भात, पोलीस आयुक्तांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रक जारी केले आहे. त्यात पद्मनाभन यांनी म्हणाले की, “प्रतिबंधात्मक आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे अथवा बाळगणे, कोणत्याही इसमाचे, चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे, पुढार्यांचे चित्रांचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, सभ्यता अगर नीतिमत्ता राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल, असे वर्तन करणे यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मिरवणूक काढणे, भाषण करणे, आविर्भाव करणे, सभा घेणे, जमाव करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.