पुणे-महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेची पिंपरी चिंचवड शहर कार्यकारीणी प्रदेश अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी जाहीर केली आहे. पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी नगरसेवक संदीप नखाते यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी कमलेश पवार यांची निवड करण्यात आली आहे. नखाते यांनी या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
इतर कार्यकारीणी
कार्याध्यक्ष पांडुरंग राजे, सचिव विशाल गुरव, प्रसिद्धी प्रमुख योगेश आचार्य, संपर्कप्रमुख दत्ता दाखले, व्यापारी आघाडी मुकेश बाफना, चिंचवड विधानसभा अध्यक्ष आकाश चिंचवडे, तुषार कोकणे, काळेवाडी डॉ.मनीषा दनाने, विलास सुतार, सचिन खळमाळे, ज्ञानेश्वर साबळे, विनोद वाघमारे, निलेश भट, धर्मेंद्र अग्रवाल, नीरज साळुंखे, अमोल महाजन आदींची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे मुख्य कार्यालयात ही निवड करण्यात अली. यावेळी अध्यक्ष राजेंद्र कपोते, संपर्क प्रमुख मिलिंद चौधरी, जिल्हाध्यक्ष संदीप जादा, योगेश शिंदे, सचिन काळे, सागर म्हस्के, योगेश विनोदे आदी उपस्थित होते.