पिंपरी : पिंपरी ते निगडी कॉरीडॉर मेट्रो मार्गाचा डीपीआर प्रस्तावास स्थायी समितीच्या आज (मंगळवारी ) झालेल्या सभेत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने दिलेल्या प्रकल्प आराखड्यास तब्बल 1048.22 कोटी खर्चास मान्यता देवून हा प्रस्ताव महासभेकडे वर्ग करण्यात आला आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने स्वारगेट ते पिंपरीपर्यंत मेट्रो डीपीआर तयार केला होता. शहरातील नागरिकांनी केलेल्या आंदोलन आणि पाठपुराव्यामुळे पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो वाढविण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला आहे. त्या प्रस्तावास स्थायी समितीने आज मान्यता दिली. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर संबंधित अहवाल सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर तो राज्य सरकारकडे व राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठविणार आहे.
हे देखील वाचा
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गाने मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. दापोडीपासून पिंपरीपर्यंतच्या मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. हाच मेट्रो मार्ग पिंपरी महापालिका भवनापासून निगडीपर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करून महापालिकेला सादर केला आहे. त्यात पिंपरी ते निगडीदरम्यानची मेट्रो स्थानके, मार्गाची लांबी, संबंधित प्रकल्पाच्या कामाची पद्धती नमूद केली आहे. संबंधित मेट्रो मार्ग उभारणीसाठी भूसंपादन करणे व मार्गाला अडथळा ठरणार्या सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करणे आदी कामांचा समावेश आहे. या कामासाठी सुमारे एक हजार 48 कोटी 22 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
दृष्टिक्षेपात मेट्रो मार्ग
पिंपरी महापालिका भवन ते निगडीपर्यंतचा मेट्रो मार्ग 4.413 किलोमीटर लांबीचा असेल. त्यावर तीन स्थानके प्रस्तावित असून, त्यात चिंचवड स्टेशन, आकुर्डी व निगडी यांचा समावेश आ