पिंपरी मंडईत अल्पवयीन मुलीचा खून

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी येथे अल्पवयीन मुलीचा गळा आवळून खून करून मृतदेह पिंपरी भाजी मंडई येथे गाळ्यामध्ये पुरल्याचे गुरूवारी उघडकीस आले. पिंपरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. खूनचा प्रकार चार दिवसांपूर्वीच घडला आहे. साक्षी वाघोलीकर (वय 15) हिचे रफिक इमाम शेख याच्या सोबत अनैतिक संबंध होते. तिच्या मागण्या वाढल्याने रफिकने तिचा 30 जुलै रोजी गळा आवळून खून केला.

बेपत्ताची दिली होती
मंडईमध्ये रफिकचा भाजी विक्रीचा गाळा आहे. त्याने रविवारी साक्षीला गाळ्यात बोलावून घेतले. तेथे तिचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दुकानात खड्डा खणून पुरून टाकला. याप्रकरणी पालकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. पोलीस तपास करत असताना गुरुवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला.