तरुणाला ठेवले धरून आणि घरी केला फोन
पिंपरी-चिंचवड : पिंपरी रेल्वे स्थानकावर एका तरुणाला तीन-चार जणांच्या टोळक्याने धरुन ठेवले. नंतर त्याच्या घरी फोन करुन तीन हजारांची मागणी केली. रक्कम मिळताच सर्वांनी पोबारा केला. रेल्वे पोलिस पोहोचेपर्यंत तरुणाला सोडून टोळके पसारही झाले. ही घटना शनिवारी (दि.18) रात्री सव्वा नऊ वाजता घडली. लूटमारीच्या नव्या प्रकाराने पोलिसही अचंबीत झाले आहेत.
छेड काढल्याचा केला बहाणा
हे देखील वाचा
याप्रकरणी रेल्वे पोलीसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिव मनोज मिश्रा हा आकुर्डीवरुन कासारवाडीला जायला निघाला होता. दरम्यान लोकलमध्येच तीन ते चार तरुण त्याच्याकडे आलो व तू आमच्या बहिणीला का छेडतो असे विचारत त्याच्याशी ते वाद घालू लागले. त्यांनी मिश्राला पिंपरी रेल्वे स्थानकावर उतरवले. तेथे त्यांनी त्याच्या जवळचा फोन, घड्याळ काढून घेतले. शिवच्या वडीलांना फोन करुन त्यांनी तीन हजार रुपये मागितीले.
पैसे मिळण्याअगोदरच सोडले
दरम्यान ही खबर पोलिसांनाही कळाली, पिंपरी पोलीस व रेल्वे पोलीस घटना स्थळी पोहचले पण तोपर्यंत शिवच्या वडीलांनी पैसे देऊन टाकले होते व त्यां टोळक्याने शिवला सोडले देखील होते. त्यामुळे केवळ तीन हजार रुपयांसाठी टोळक्याने अपहरणासारखा गुन्हा केला. त्यसाठी मुलाच्या वडिलांकडे खंडणी मागितली.
पोलिसांचा वचक नाही
याप्रकरणी रेल्वे पोलीस त्या टोळक्याचा शोध घेत असून लवकरच ते सापडतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त आहे. ही घटना तशी छोटी असली तरी विचार करायला लावणारी आहे. कारण रेल्वे स्थानका सारख्या गजबजलेल्या परिसरात तरुण मुले केवळ तीन हजारांसाठी एका मुलाला पकडून ठेवतात, त्याच्या घरी पैशाची मागणी करतात. या गुन्ह्यांचे गांभीर्य त्यांना किंतपत लक्षात आले असेल हे माहिती नाही पण शहरात अशा घटना घडत असतील तर पोलिस खात्याला त्यांची पकड अधीक घट्ट करावी लागणार आहे हे नक्की.