पिंपरी : ग्राहक व वीज वितरण कंपनी यांच्यामध्ये सुसंवाद व समन्वय राखण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या पिंपरी विद्युत वितरण समितीच्या अध्यक्षपदी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांची गुरुवारी राज्य शासनाने एका आदेशान्वये नियुक्ती केली. या समितीमध्ये क्षेत्रातील महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर यांची सहअध्यक्ष तर उपविभागीय अभियंता बालचंद भोळे यांची सदस्य सचिव म्हणून निवड करण्यात आली.
समितीच्या सदस्यपदी नगरसेवक अमित गावडे, प्रमोद कुटे, मिनल यादव, अश्विनी चिंचवडे, तुषार हिंगे, शर्मिला बाबर, कोमल मेवानी, आशा धायगुडे-शेडगे, शितल उर्फ विजय शिंदे, शैलजा मोरे, ग्राहक प्रतिनिधी सदस्य उद्योग क्षेत्र गणेश लंगोटे, ग्राहक प्रतिनिधी सदस्य समीर जावळकर, ग्राहक प्रतिनिधी सदस्य अभिजीत गोफण, ग्राहक प्रतिनिधी सदस्य निता बैस (परदेशी), वीज वितरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेली व्यक्ती राहुल कोल्हटकर, स्वंय सेवी संस्था प्रतिनीधी देवीदास साठे आदींची निवड करण्यात आली.