पिंपरी विधानसभेसाठी अमित गोरखे गुरुवारी भरणार उमेदवारी अर्ज

0

पिपरी – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार आहेत. अमित गोरखे उद्या गुरुवारी (दि. ३) रोजी सकाळी साडेनऊ वाजता आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह अर्ज दाखल करणार आहेत. 
पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अमित गोरखे भाजपकडून इच्छूक होते. हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आल्याने पिंपरी विधानसभा मतदारसंघातून लोकशाहीलर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. अमित गोरखे उद्या गुरुवारी (दि. ३) रोजी सकाळी दहा वाजता आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 
आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकातून सकाळी साडेनऊ वाजता कार्यकर्त्यांसमवेत भव्य रॅलीचे आयोजन त्यांच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व कार्यकर्ते व त्यांचे मित्र मंडळ यांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन अमित गोरखे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा पाठिंबा असल्याने आणि समाजातील असंख्य कार्यकर्त्याशी चर्चा करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे अमित गोरखे यांनी म्हटले आहे.