पिंपरी सांडसमध्येही कचरा डेपोला विरोध

0

पुणे : फुरसुंगी व उरुळी देवाची ग्रामस्थांनी आपल्या हद्दीत कचरा टाकू देण्यास विरोध केल्याने शहरातील कचरा प्रश्‍न गंभीर बनला असतानाच आता पिंपरी सांडस ग्रामस्थांनीही प्रस्तावित कचरा डेपोस विरोध सुरू केला आहे. त्यामुळे शहरातील कचरा प्रश्‍नातील गुंतागुंत वाढली आहे.

फूुरसुंगी व उरुळी देवाची ग्रामस्थांनी पूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळातही कचरा डेपोस विरोध दर्शवला होता. त्यावेळी तत्कालीन आघाडी सरकारने कचरा डेपोसाठी वढू तुळापूरची निवड केली होती. तेथील ग्रामस्थांच्या विरोधामुळे पुढे पिंपरी सांडसमधील जागा निश्‍चित करण्यात आली होती. त्याबाबतचा एक प्रस्तावी केंद्रास पाठऊरूयात आला होता.

टपपरी सांडसमधील प्रस्तावित जागा वन खात्याच्या मालकीची आहे. त्यामुळे वन खात्याशीही याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानंतर केंद्रानेही या जागेस संमती दर्शविली होती. पिंपरी सांडस ग्रामस्थांनी पूर्वीही विरोध केला होता. तसेच, वन खात्याच्या जमिनीवर चांगली झाडी असल्याने तेथे कचरा डेपो केल्यास पर्यावरणाचीही हानी होईल, असा मुद्दा पुढे केला होता. मात्र, पुढे तेथे कचरा डेपो उभारण्यासाठी वेगाने हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हा मुद्दा मागेच पडला होता.

आता फुरसुंगी व उरुळी देवाची ग्रामस्थांनी जोरदार विरोध सुरू केल्याने पिंपरी सांडसमधील प्रस्तावित कचरा डेपोचा मुद्दा पुन्हा पुढे येत असून, या प्रस्तावित कचरा डेपोस पिंपरी सांडसच्या ग्रामस्थांनी पुन्हा जोरदार विरोध सुरू केला आहे. प्रस्तावित कचरा डेपोच्या विरोधात ग्रामस्थांनी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन केली असून, या समितीने शुक्रवारी जोरदार निषेध आंदोलन केले.

फुरसुंगी व उरुळी देवाची ग्रामस्थांना राज्य सरकारने वेळोवेळी अनेक आश्‍वासने दिली होती. मात्र, ती कधीच पाळी गेली नाहीत. आता आमच्या गावालाही अशीच आश्‍वासने दिली जातील. परंतु, ती कधीच पाळली जाणार नाहीत. त्यामुळेच प्रस्तावित कचरा डेपोस आमचा विरोध असल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे.

पिंपरी सांडसचा परिसर भीमा नदीला लागून आहे. हा सर्व परिसर बागायती आहे. परिसरात विहिरींचे प्रमाण चांगले असून, या विहिरींना बारमाही पाणीही असते. या पाण्यावरत परिसराची व शेतीची तहान भागते. या परिसरात कचरा डेपो झाल्यास त्याच्या प्रदुषणामुळे नदीलाही धोका संभवतो आणि आमच्या विहिरींचे पाणीही वापरायोग्य राहणार नाही. तसेच, कचरा डेपोमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍नही उपस्थित होऊ शकतो, असे पिंपरी सांडस ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळेच गावाच्या परिसरात कचरा डेपो होऊ देणार नाही आणि सरकारने तसा प्रयत्न केल्यास त्याला सर्वशक्तिनीशी विरोध केला जाईल, असा इशाराही कृती समितीने दिला आहे.