फैजपूर- पिंपरूड येथील एका गोदामात गुटख्याचा साठा असल्याची गुप्त माहिती फैजपूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी शनिवारी सायंकाळी धाड टाकत लाखोंचा गुटखा जप्त करीत दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाला माहिती कळवण्यात आली आहे. पोलिसांनी सेवकराम दशरथ नारवानी (32, रा.सिंधी कॉलनी, जळगाव) व गोदाम मालक संतोष प्रभाकर पाटील (58, रा.पिंपरूड) या दोघांना अटक करण्यात आली. आरोपींनी मूळ मालक दिलीप बदलानी असल्याचे सांगितल्यानंतर मूळ मालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक अनिल गुजर यांनी सांगितले.
गुप्त माहितीनुसार पोलिसांची कारवाई
फैजपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहा.फौजदार हेमंत सांगळे, हवालदार दिलीप तायडे, पोलिस नाईक किरण चाटे, योगेश महाजन, चेतन महाजन, अलताफ शेख यांच्या पथकाने पिंपरूड गावातील एका गोदामावर छापा टाकत हजारो रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन निरीक्षक अनिल गुजर, सहा.निरीक्षक चंद्रकांत सोनवणे यांनी रात्री उशिरापर्यंत कारवाई केली.