पिंपळकोठा बु.येथे विजेच्या धक्याने बैल ठार

0

एरंडोल । तालुक्यातील पिंपळकोठा बु. येथील शेतकरी शिवाजी गुलाब पाटील हे सोमवारी 31 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास बैलगाडीने शेतात जात असताना गावालगतच रस्त्यात विजेची तारा पडलेल्या असल्यामुळे बैलांचा तारांना स्पर्श झाला. यात बैलांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने दोन्ही बैल जागीच ठार झाले. शिवाजी पाटील हे शेती कामासाठी जात असतांना गावाच्या बाहेरील भिल्ल वस्तीजवळील मारवाडी डीपी जवळ तुटून पडलेल्या विजेच्या तार ज्यात विज प्रवाह सुरु होते त्या पडल्या होत्या.

विज प्रवाह सुरु असलेल्या तारांचा स्पर्श झाल्याने बैलांना जोरदार धक्का बसला. शिवाजी हे जखमी होऊन बाजु फेकले गेल्याने बचावले. यावेळी तात्काळ महावितरणचे सहाय्यक अभियंता पी.बी.भालेराव व तलाठी नंदकुमार शिंदे यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला व महावितरण कडून तत्काळ मदत म्हणुन चार हजार रोखीने मदत केली. तसेच पुढील मदतीचे अश्वासन दिले. दिपक पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला तशी नोंद केली आहे.